पाणीटंचाईसह प्रलंबित प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष.

पाणीटंचाईसह प्रलंबित प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष.

पिंजारी माहेमूद 
 तालुका प्रतिनिधी: देगलूर  

 देगलूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही महिन्यापूर्वी तालुक्यातील सर्कल मध्ये स्थानिक नेत्यांच्या बैठका, उद्घाटन सोहळे आणि गावभेटींची चढाओढ सुरू होती. भावी उमेदवार गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेत होते. मात्र निवडणुका लांबल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी या तालुक्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील हाणेगाव, नरखेड, करडखेड, शहापूर, खानापूर, मानूर या सर्कलमधील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे येथे नेहमीच विविध नेत्यांचे लक्ष असते. मात्र सध्या गावातील मूलभूत सुविधा व प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरीक व्यक्त करत आहेत. देगलूर तालुक्यामध्ये अनेक महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकँती करावी लागत आहे. तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधीने किंवा सबंध नेत्यांनी गावाला भेट देऊन समस्येची दखल घेतली नाही, याबद्दल नाराजी देगलर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये पसरली आहे. देगलूर तालुक्यामध्ये काम आहे. आमच्या पूर्ण झाले नाही. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करून प्रशासनावर निवेदन दिली होती. अनेक वृत्तवृत्पत्रातून प्रश्न मांडण्यात आले. मात्र त्यानंतर वृत्तपत्रातून प्रश्न निर्माण झाले होते. किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडण्यात आले, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावातील पाणीटंचाई, प्रलंबित विकास कामे आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे मत तालुक्यातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Previous Post Next Post