*हाजी मसूद अहेमद खान यांच्या नेतृत्वाखाली फतेह चौक प्रवेशद्वारास “बैद बिरादरी प्रवेशद्वार” नामकरणाची मागणी*
( मीडिया पोलिस टाईम अकोला जिला संपादक इमरान खान)
अकोला, दि. २४ ऑगस्ट २०२६ : फतेह चौक येथे आमदार साजिद खान पठाण यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारास “बैद बिरादरी प्रवेशद्वार” असे अधिकृत नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आम आदमी पार्टी, अकोलाचे महानगर अध्यक्ष हाजी मसूद अहेमद खान यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
फतेह चौक व परिसरात बैद बिरादरीचे सुमारे १० ते १५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. हा समाज अनेक वर्षांपासून परिसराच्या सामाजिक तसेच शहरी विकासात आपले योगदान देत आहे. करदाते नागरिक म्हणून महानगरपालिका व शासनाला विविध कर तसेच शासकीय देयके भरून शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या या समाजाच्या भावना व सामाजिक सन्मानाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
आमदार निधी हा सार्वजनिक निधी असल्याने सदर प्रवेशद्वारास समाजाच्या योगदानाची व सामाजिक ओळखीची जाणीव ठेवून “बैद बिरादरी प्रवेशद्वार” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
महानगरपालिका प्रशासनाने याबाबत नियमानुसार प्रस्ताव व ठराव घेऊन अधिकृत नामकरण करावे तसेच प्रवेशद्वारावर नामफलक लावण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली.
शिष्टमंडळात उपस्थित
हाजी मसूद अहेमद खान — महानगर अध्यक्ष, आम आदमी पार्टी, अकोला
अरमान खान पठाण
गजानन बुडुकले
अकीब खान
सलीम देशमुख
रहमान खान
हाजी मसूद अहेमद खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महानगरपालिका प्रशासनाकडे ही मागणी मांडली असून, नागरिकांच्या भावना व सामाजिक सन्मान लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक व तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

