*"ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई*अकोला:बाबुळगाव-गुडदी रोडवरील बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा; ०८ आरोपी ताब्यात, ₹४,५४,५००/-किमतीचा मुद्देमाल जप्त..

*"ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई*

अकोला:बाबुळगाव-गुडदी रोडवरील बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा; ०८ आरोपी ताब्यात, ₹४,५४,५००/-
किमतीचा मुद्देमाल जप्त..

(अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान)

 अकोला,
दि. २४ ऑगस्ट २०२६: मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध धंद्यांविरोधात राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बाबुळगाव-गुडदी रोड, गुडदी, अकोला येथील संदीप गावंडे यांच्या बंद गोडाऊनमध्ये छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी आठ इसम मागील सुमारे तीन तासांपासून पत्त्यांच्या साहाय्याने जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ कारवाई करून सर्व आठ आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकली असा एकूण ₹४,५४,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी

१) आशिष श्रीकृष्ण कीर्तन, वय ३८ वर्षे, रा. गुडदी, अकोला.

२) प्रमोद मनोहर नवरखेडे, वय २५ वर्षे, रा. फत्तेपूरवाडी, मोठी उमरी, अकोला.

३) रोहन गजानन कठाडे, वय २२ वर्षे, रा. देशमुख कॉलनी, गुडदी, अकोला.

४) योगेश सुरेश कीर्तन, रा. मोठी उमरी, अकोला.

५) पंकज कैलास गाढवे, वय ४० वर्षे, रा. मोठी उमरी, अकोला.

६) दत्ता पुंडलिकराव ठाकरे, वय ४४ वर्षे, रा. फत्तेपूरवाडी, मोठी उमरी, अकोला.

७) गोपाल जगन्नाथ मदनकार, वय ४४ वर्षे, रा. मोठी उमरी, अकोला.

८) सागर नंदू विजयकर, वय २२ वर्षे, रा. जुने ग्रामपंचायतजवळ, मोठी उमरी, अकोला.

जप्त मुद्देमाल

कारवाईदरम्यान आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे :

रोख रक्कम - ₹१४,५००/-

०६ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल

०४ मोटारसायकली

एकूण जप्त मुद्देमाल - ₹४,५४,५००/-

सदर कारवाईप्रकरणी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू, अकोला येथे जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात

आला असून पुढील तपास सुरू आहे.

"ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध धंद्यांविरोधात कारवाई तीव्र

अकोला जिल्ह्यातील जुगार, मटका, अवैध दारू, अमली पदार्थ तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अथवा अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अकोला जिल्हा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडकमा. अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी, Pi नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI अनिल चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली HC फिरोज खान, HC शेख हसन, HC खुशाल नेमाडे, HC एजाज अहमद, HC श्रीकांत पातोंड, HC मंगेश इंगळे, PC आकाश मानकर, PC अभिषेक पाठक, PC राज चंदेल, PC धीरज वानखडे, PC मोहम्मद आमिर यांनी सदर धडक कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखा, अकोला
Previous Post Next Post