स्वातंत्र्यदिनानिमित्त वसंतवाडी तांड्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वही-पुस्तकांचे वाटप..

स्वातंत्र्यदिनानिमित्त वसंतवाडी तांड्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वही-पुस्तकांचे वाटप

(जळगाव तालुका विभागीय संपादक किशोर चव्हाण)


वसंतवाडी तांडा, ता. जळगाव, जि. जळगाव : देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर वसंतवाडी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पुस्तके व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण व तांडा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. वसंतवाडी तांडा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच शाळेच्या विविध मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक 
Previous Post Next Post