घरकुलांच्या नावावर ग्रामसभा; ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा नागरिकांचा आरोप

घरकुलांच्या नावावर ग्रामसभा; ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा नागरिकांचा आरोप

जळगाव तालुका प्रतिनिधी 

बोरनार, ता. जळगाव : बोरनार येथे १४ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही ग्रामसभा घरकुलांच्या विषयाचे कारण पुढे करून आयोजित करण्यात आली असून, ग्रामस्थांना प्रत्यक्षात समाधानकारक माहिती न देता त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घरकुलांसंदर्भात स्पष्ट माहिती, पात्र लाभार्थ्यांची यादी, निवड प्रक्रिया तसेच संबंधित कागदपत्रांबाबत ग्रामसभेत पारदर्शक माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांकडून ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी “घरकुल कोणाला मंजूर झाले? पात्र लाभार्थ्यांची यादी काय आहे? लाभार्थी निवडीचे निकष कोणते? मंजूर घरकुलांसाठी किती निधी प्राप्त झाला आणि किती वितरित झाला?” असे प्रश्न उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांवर स्पष्ट व लेखी माहिती न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, ग्रामसभा ही केवळ औपचारिकता न राहता गावातील नागरिकांना योजनांची संपूर्ण व पारदर्शक माहिती मिळण्यासाठी असते. त्यामुळे घरकुल योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांना बोलावून त्यांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे न देणे ही बाब गंभीर असून, या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

घरकुल योजनेतील लाभार्थी निवड, मंजूर निधी, वितरित निधी आणि संबंधित ग्रामसभा ठराव यांची कागदपत्रांसह माहिती ग्रामस्थांसमोर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामसभेचे इतिवृत्त व उपस्थिती नोंदही ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध कर
Previous Post Next Post