पत्रकारावर प्राणघातक हल्ला; छत्रपती संभाजीनगरमधून तिघे ताब्यात, काय सांगितलं…
अहिल्यानगर ।प्रशांत बाफना
शहरातील पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विलेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
20 ऑगस्ट रोजी पत्रकार सुशिल मारूतराव थोरात (वय 49, रा. राज्य कर्मचारी सोसायटी, समतानगर, सावेडी) यांच्या मारुती अल्टो कारला आरोपी सोनू कोहक याच्या मोपेडची धडक झाली होती. तसेच आरोपींच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वादातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि एका अनोळखी व्यक्तीने पत्रकार थोरात व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी थोरात यांना खाली पाडून डोक्यात व पाठीवर दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. पथकांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विलेषणाचा आधार घेतला. दरम्यान, आरोपी राजगुरुनगर व पुणे शहर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे शोध घेतला; मात्र आरोपी तेथून पसार झाले होते. यानंतर 24 ऑगस्ट रोजी आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक (27, रा. बोल्हेगाव), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (27, रा. सावेडी) आणि प्रशांत शिवाजी निक्रड (25, रा. सावेडी) हे छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तिघांनी पत्रकार सुशिल थोरात व त्यांच्या मुलाला मारहाण केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी हेमंत उर्फ सोनू कोहक याच्यावर यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर प्रशांत निक्रड याच्यावरही यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत

