उर्दू हायस्कूल ग्राऊंड समोरील रोडवर तरुणाचा चाकू व तलवारीने वार करून निघृण खून प्रकारणातील आरोपींना पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, पोलिसांनी अवघ्या एका तासात वेगवान तपास करून गुन्ह्यातील ०३ आरोपीतांना केले जेरबंद*

*उर्दू हायस्कूल ग्राऊंड समोरील रोडवर तरुणाचा चाकू व तलवारीने वार करून निघृण खून प्रकारणातील आरोपींना पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, पोलिसांनी अवघ्या एका तासात वेगवान तपास करून गुन्ह्यातील ०३ आरोपीतांना केले जेरबंद*


(अकोला जिला विभागीय संपादक इमरान खान)

अकोला;दिनांक २३/०८/२०२६ रोजी रात्री २२.३० वा. दरम्यान उर्दू हायस्कूल मैदानासमोर फिर्यादी सौ. मंजु निलेश जाधव (वय २२ वर्षे, रा. आंबेडकर नगर, नवीन बस स्टैंड मागे, अकोला) यांचे दिर नितेश उर्फ मायकल श्रीराम जाधव (वय २२ वर्षे) हे मित्रमंडळीसह उर्दू हायस्कूलच्या मैदानात बसलेले असताना आरोपी रोहन उर्फ अनिकेत संतोष दामोदर, अंश प्रदिप सिरसात व ऋषभ उर्फ सागर विजय कृष्णपल्लोवार यांनी संगनमत करून जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून धारदार चाकू व तलवारीने वार करून नितेश उर्फ मायकल जाधव याचा निर्घण खून केला. सदर घटनेची माहिती मिळताच पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप. क्र. ६०५/२०२६ कलम १०३ (१), ३(५), ३५२ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी साहेब, यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील साहेब श.वि. अकोला यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी अटकेबाबत सूचना दिल्या. पो. नि. श्रीमती मालती कायटे, पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला यांनी आरोपींच्या अटकेसाठी तात्काळ विशेष शोध पथके तयार करून रवाना केली. पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या एका तासाच्या आत परिसरात शोध मोहीम राबवून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपीः (१) रोहन उर्फ अनिकेत संतोष दामोदर, वय २२ वर्षे, रा. आंबेडकर नगर, अकोला (२) अंश प्रदिप सिरसात, वय २१ वर्षे, रा. राहुल नगर, ह.मु. टेलीकॉम कॉलनी, अकोला (३) ऋषभ उर्फ सागर विजय कृष्णपल्लोवार, वय १९ वर्षे, रा. आंबेडकर नगर, अकोला या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील साहेब श. वि. अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रीमती मालती कायटे, स.पो.नि. महेंद्र शिंदे, PSI दिनेश पवार, तसेच अंमलदार पो. हे.कॉ. श्रीकांत आजलसांडे, पो.कॉ. शक्ती कांबळे, पो.कॉ. पवन सिरसात, पो. कॉ. एकनाथ त्रिकाळ यांनी केली आह
Previous Post Next Post