लघुळ येथील रहिवासी दिलीप पिराजी सोनकांबळे यांचे दुःखद निधन

लघुळ येथील रहिवासी दिलीप पिराजी सोनकांबळे यांचे दुःखद निधन

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील लघुळ, ता. बिलोली, जि. नांदेड येथील रहिवासी दिलीप पिराजी सोनकांबळे (वय ४९ वर्षे) यांचे दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी शनिवारी रात्री ११.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता लघुळ येथील बौद्ध स्मशानभूमीत बौद्ध धम्मीय पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धवासी दिलीप पिराजी सोनकांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
ते वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेड (दक्षिण) जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे (घुंगराळेकर) यांचे सासरे होते.
Previous Post Next Post