राहुरी नगर -पाथर्डी मतदारसंघातील रस्त्यासाठी 30 कोटी निधी मंजूर -आ .अक्षय कर्डिले यांची माहिती..

राहुरी नगर -पाथर्डी मतदारसंघातील रस्त्यासाठी 30 कोटी निधी मंजूर -आ .अक्षय कर्डिले यांची माहिती..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


राहुरी नगर व पाथर्डी मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी आमदार अक्षय कर्डिले यांच्या प्रयत्नातून तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यातून प्रलंबित मिरी घोडेगाव या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून त्यामुळे पाथर्डी आणि नेवासा तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता खड्ड्यामुळे अडगळीत पडला होता मात्र या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने निश्चितपणे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे कामच शिंगवे ते प्रा जिमा तेहतीस ग्रामीण मार्ग या रस्त्यासाठी देखील तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पांढरी पुल - मिरी - शेवगाव बेलाचे झाडापर्यंतच्या रस्त्याची देखील दुरुस्ती केली जाणार आहे हा रस्ता शेवगाव नगर पाथर्डी व नेवासा तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा असून या रस्त्याच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे केशव शिंगवे पागरमल - पांढरी पूल पर्यंतच्या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर वांबोरी ते खोसपुरी मिरीमाका रस्त्यासाठी साडेतीन कोटी आणि ताहाराबाद -राहुरी -सोनई रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर राहुरी ते बारागाव नांदूर या रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी प्राप्त झाला असून पंधरा दिवसात या रस्त्यांच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे

(सर खालील कॉलम बातमी चौकट मध्ये घ्या )
मुख्यमंत्र्यांच्या बेरर चेकची चर्चा
विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिकांनी विजयी करा या मतदार संघाच्या विकास कामासाठी आजच अक्षयला चेक देऊन जात असल्याचे त्यांनी त्यावेळेस आपल्या भाषणात म्हटले होते त्याच अनुषंगाने पहिल्याच टप्प्यात रस्त्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आमदार अक्षय कर्डिले यांनी बेरर चेक वटायला सुरुवात केली आहे की काय अशी चर्चा आता मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे .
Previous Post Next Post