मोठ्या भावाच्या दारूच्या व्यसनाला व आपल्या लग्नाला अडसर ठरत असल्याने लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून..
(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे थरारक घटना घडली आपल्या मोठ्या भावाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आणि आपल्या स्वतःच्या लग्नात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा फोन केल्याची खळबळ जनक घटना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे घडली आहे .
श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपासाची चक्रे फिरवून आरोपी लहान भावाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय 27 वर्ष रा.उक्कलगाव ता .श्रीरामपूर )असे मृत्य मोठ्या भावाचे नाव असून आरोपी अनिकेत विजय ठाकरे वय 26 असे खून करणाऱ्या लहान भावाचे वय आहे दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी मयत आशिष हा त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला होता त्याच्या डाव्या कानाखाली व मान्यवर गंभीर प्रकारच्या जखमा असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे शेव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला वैद्यकीय अहवालामध्ये टनक हत्याराने मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा घातपात व खून असल्याचे स्पष्ट झाले आहे .
पोलिसांनी मृताच्या पत्नीसह नातेवाईकांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे मयत आशिष याला दारूचे तिव्र व्यसन होते तो दारू पिऊन घरात सतत आरडाओरड करत अशिषच्या या त्रासामुळे त्याची पत्नी गेल्या काही दिवसापासून तिच्या आई-वडिलांकडे राहत होती मोठा भाऊ आशिष च्या दारू पिण्याच्या व आरडाओरडा करण्याच्या सवयीमुळे आपले लग्न जमत नसल्याची भावना लहान भाऊ अनिकेतच्या मनात निर्माण झाली होती याच वय मनस्यातून त्यांनी मोठ्या भावाला संपवल्याने तपासात पुढे आले आहे .पोलिसांनी तात्काळ अक्षय पारखे व अनिकेत पारखे या दोघा भावांना ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे स . पो . नि .चेतन लोखंडे या पथकाने तातडीने तपासाची शेतकरी फिरवली .
या प्रकरणी मृत आशिष याची पत्नी साक्षी पारखे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 103 ( १ )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर पोलिसांच्या या जलद व धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

