श्रीरामपूर -राहुरी मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्याची जिल्हा अधिकाऱ्यांना आमदार हेमंत ओगले यांची पत्राद्वारे मागणी.

श्रीरामपूर -राहुरी मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्याची जिल्हा अधिकाऱ्यांना आमदार हेमंत ओगले यांची पत्राद्वारे मागणी.


(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


श्रीरामपूर -राहुरी विधानसभेचे आमदार श्री .हेमंत ओगले यांनी नुकतेच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक धोक्यात असल्याने आपण तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी श्रीरामपूर -राहुरी विधानसभेचे आमदार श्री .हेमंत ओगले यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे .
पत्रामध्ये आमदार हेमंत ओगले म्हणाले की श्रीरामपूर -राहुरी मतदार संघात यंदाच्या अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळबल्या असतानाच झालेल्या पावसामुळे काही भागात पिकांची मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे .
या गंभीर परिस्थितीची आपण तातडीने दखल घेत श्रीरामपूर -राहुरी मतदार संघात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यात यावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पत्राद्वारे केली आहे .
शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावरच न राहता त्यांना शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या श्रीरामपूर -राहुरी विधानसभेचा आमदार म्हणून आपल्याकडे जिल्हाधिकारी या नात्याने सातत्याने माझा पाठपुरावा सुरूच राहील असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात आमदार हेमंत ओगले यांनी नमूद केले आहे .
Previous Post Next Post