राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती विद्यालयाच्या रंग कामासाठी २००१व २०० २ च्या १०वी माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत..
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यात असणाऱ्या राहुरी फॅक्टरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सलग्न असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या रंग कामासाठी 2001 व 2002 च्या दहावीच्या माझी विद्यार्थ्यांकडून ( ३६००० ) छत्रीस हजार रुपये रंग कामासाठी मदत म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री . बी . एल .शिरसाट सर यांच्याकडे दहावीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे डॉक्टर रवी घुगरकर व शिवचरित्रकार हसन सय्यद यांच्या हस्ते देण्यात आले .
यावेळी विद्यालयाचे कलाध्यापक श्री .विशाल तागड सर यांनी 2001 व 2002 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले .

