*रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी दारूच्या अड्ड्यांवर एकाचवेळी छापे; ८१ हजारांचा मुद्देमाल उद्ध्वस्त.*

*रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी दारूच्या अड्ड्यांवर एकाचवेळी छापे; ८१ हजारांचा मुद्देमाल उद्ध्वस्त.* 

    (  जळगाव*जिल्हा प्रतिनिधी:- जितू इंगळे* )


दि. ०४/१०/२०२६ रोजी मा. पोलिस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम ही गावठी दारु व हातभटटीवर धाडसत्र राबविण्यात आले आहे.सदर विशेष मोहीमे अंतर्गत रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेत्रुत्वााखाली रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, बिट अमंलदार व रावेर गुन्हे शोध पथक यांचे पथक तयार करुन एकाचवेळी विविध ठिकाणी धाड टाकुन कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याप्रमाणे रावेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी कुसंबा, ताडजिन्सी, मोव्हाल, गंगापुरी धरणाव्या काठावर पाडला, पाडला खु., नेहता येथे एकाच वेळी धाड टाकुन खालील प्रमाणे कारवाई केलेली आहे.आज रोजी पहाटे रावेर पोलीस स्टेशन वे अधिकारी व बिट अमंलदार यांच्या पथकाने विशेष मोहीते अंतर्गत विविध ठिकाणी एकाच वेळी धाड टाकत गावठी दारु,हातभटटीवी दारु, कच्चे रसायन, साधन सामग्री जागेवर पकडुन नाश करण्यात आलेली आहे.रावेर पोलीस स्टेशनव्या अधिकारी व बिट अमंलदार यांनी कुसंबा शिवारात धाड टाकुन २० लिटर गा. हा. भटटीची दारु तसेच गुळ मोह मिश्रीत १०० लिटर कच्चे रसायन व १५० लि. पक्के रसायन मिळुन आले होते. सदरची हातभटटी ही दिपक सुरेश भालेराव क्य- ४२ रा कुसंबा ता. रावेर हा चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. असुन सदर आरोपीतावर रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही चालु आहे.तसेच रावेर पोलीस स्टेशन वे केन्हाळा बिट अमंलदार यांनी केन्हाळा गावाजवळ गोपनिय बातमीच्या आधारे दोन गावठी हात भटटीवर धाड टाकुन तेथुन एकुन २८० लि. गावठी दारु व ५५ लि. मोह मिश्रीत उकळते रसायन पकडुन जागीच नाश करण्यात आले आहे. सदरची हातभटटी ही बिस्मीला चांदखों तडवी रा. पाडला व असलम हसन तडवी रा. पाडला हे चालवित होते.याच प्रमाणे बिट अमंलदार व रावेर गुन्हे शोध पथकाने अजंदा व पाल गावी धाड टाकुन कृष्णा मधुकर राठोड रा. पाल याचे ताब्यातुन १५ लि. गा.हा.भ ची दारु पकडण्यात आली आहे. तसेच अजंदा गावी सुपडु भिक्सन तायडे रा. नेहता यावे कडुन 30 लीटर गा.हा.भ ची दारु व १०० लि. कच्चे रसायन पकडुन जागीच नाश करण्यात आले आहे.तरी आज रोजी रावेर पोलीस स्टेशन कडुन विट अमंलदार व गुन्हे शोध पथकाने ठिकठिकाणी धाड टाकुन एकुन ८१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पकडुन जागीच नाश करण्यात आला आहे. तसेच वरील सर्व आरोपीतांवर रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील कारवाई वालु आहे. रावेर पोलिस स्टेशन कडुन यापुढे ही कार्यवाही चालु राहणा आहे.सदर कार्यवाही ही मा. श्रीकांत धिवरे सो पोलीस अधिक्षक यांच्या विषेश मोहीमे अंतर्गत मा. श्री संदीप गावीत सो अपर पो. अधिक्षक जळगांव परीमंडळ, तसेच मा.श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशन चे पो. नि. संदीप पाटील, स.पो.नि हरीदास बोचरे, सपोनि. अमुल बच्छाव, पोउपनि, मनोज महाजन, पोहेकों. विजय चौधरी, इश्वर चव्हाण, योगेश महाजन, गुन्हे शोध पथकातील पो. हे. कॉ समाधान ठाकुर , श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तुषार मोरे, योगेश पाटील, कुंदन नागमल, शुभम काळे यांनी केली आहे. पुढील तपास बिट अमंलदार व अधिकारी हे करीत आहेत.
Previous Post Next Post