शेवगाव तालुका तहानलेला असताना पाथर्डी ला पाणी देण्याचीघाई कशाला! दत्तात्रय फुंदे
अहिल्यानगर/प्रशांत बाफना — विभागीय संपादक
दुष्काळाने होरपळलेल्या शेवगाव तालुक्यात पाणीटंचाई तीव्र झाली असताना पाथर्डी तालुक्यासाठी ताजनापुर टप्पा तीन योजना प्राधान्याने करण्याच्या हालचालींवर संताप स्वाभिमानी संघटनेचे दत्तात्रय फुंदे व्यक्त केला आहे.
शेवगाव तालुक्यातील अनेक गावे कोरडी पडली असून शेतकरी पाण्यासाठी हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे, जायकवाडी धरण प्रकल्पासाठी शेवगाव तालुक्यातील २७ गावांनी मोठा त्याग केला असून त्याबदल्यात ३.८ टीएमसी पाणी शेवगावसाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्या पाण्याचा लाभ अद्याप मिळत नाही.
ताजनापूर योजनेअंतर्गत टप्पा १ दुरुस्ती साठी फक्त १९ कोटी तसेच टप्पा २ साठी २५० कोटी निधीची तरतूद करण्यात आली. परंतु पाथर्डी टप्पा तीन साठी ५०० कोटी हा शेवगाव तालुक्यासाठी भेदभाव आहे तालुक्यातील दोन्ही टप्प्यासाठी अंमलबजावणी निधीअपुरा असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला आहे.
त्याचवेळी पाथर्डी तालुक्यासाठी तब्बल ५०० कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आल्याने शेवगावमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, ताजनापूर टप्पा ३ मध्ये पाथर्डीतील गावे समाविष्ट करून मूळ प्रकल्पाचा उद्देशच बदलण्यात आला आहे. “ज्यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली, त्यांनाच पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे,” अशी भावना फुंदे यांनी व्यक्त केली.
याबाबत प्रशासनाकडे चुकीची माहिती सादर करून प्रकल्पाची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. टप्पा १ मधील पाण्याचे चर खराब असल्याचे आणि शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याचे चित्र निर्माण करण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत शेवगावच्या प्रश्नां पेक्षा ताजनापुर टप्पा तीन साठी असल्याचे जाणवले दुष्काळा मध्ये शेतकऱ्यांना मिळणारा भरीव दुष्काळ निधी सरसकट पंचनामे जनावरांच्या छावण्या यावर काही उत्तर मिळाले नाही या बैठकीत कागदी घोडे नाचवून “औपचारिकता” ठरल्याची टीका करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी इशारा देताना सांगितले की, शेवगावच्या हक्काच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत असल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. “शेवगावचा पाण्याचा हक्क अबाधित ठेवावा, अन्यथा गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
“शेवगाव एकत्र आला तरच न्याय मिळेल,” असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी एकजुटीचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात लवकरच जनजागृती मोहीम राबवून गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून देण्यात आला आहे. ताजनापुर चे पहिले दोन टप्पे सुरळीत झाल्याशिवाय टप्पा तीन चा घाट घालू नये या स्वरूपाचे निवेदन पालकमंत्री विखे यांना काल आढावा बैठकीत देण्यात आले

