मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल; अपक्ष उमेदवार रिलस्टार रविराज साबळेंची चर्चा ,मी प्रस्थापित गिळलाय, साबळेंची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर/प्रशांत बाफना :
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळाला. गेल्या तीन टर्म पदवीधरांचे आमदार राहिलेल्या सतिश चव्हाण यांना यंदाच्या निवडणुकीत पदवीधरांनी धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतासिंह पाटील यांनी येथील मतदारसंघात पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या प्रतापसिंह पाटील यांचा विजय निश्चित झाला. मात्र, येथील मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत राहिले ते शेतकरीपुत्र रिलस्टार रविराज साबळे पाटील यांची. रविराज साबळे यांनी तिसर्या फेरीअखेर तब्बल पहिल्या पसंतीची 20 हजार 450 मतं घेतली आहेत. या निकालानंतर रविराज साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यंदाच्या विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत दोन चेहरे चांगलेच चर्चेत ठरले आहेत. यामध्ये शेतकरी पुत्र म्हणून शेतीच्या प्रश्नावर आक्रमक रिलस्टार म्हणून परिचीत असलेले रविराज साबळे पाटील आणि दुसरे म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघात विदर्भातील कराळे गुरुजी. हे दोन्ही चेहरे मीडियावर चांगलेच प्रसिद्ध असून त्यांने फॉलोअर्सही लाखोंमध्ये आहेत. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत यांना काही हजार मतं मिळाली असली तरी प्रस्थापित उमेदवारांना धक्का देणारी कामगिरी त्यांनी बजावली आहे. रविराज साबळे पाटील यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड पदवीधर मतदारसंघात महायुतीचे सतीश चव्हाण यांना पराभवाचा समाना करावा लागला. कारण, मी प्रस्थापित गिळलाय, अशी प्रतिक्रिया रविराज साबळे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दिली.
मी 24 सप्टेंबर रोजी निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती, केवळ 28 दिवसांचा निवडणुक प्रचार मी केला. विधानपरिषद पदवीधर मतदारासंघांची निवडणूक ही पक्षांची मक्तेदारी असते. मी पक्षांच्या मक्तेदारीमध्ये नसून मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये मी तिसर्या क्रमांकावर आहे. आता, मला मिळालेल्या मतांवरच येथील विजयाचा उमेदवार ठरणार आहे. माझ्या दुसर्या पसंतीची मतं म्हणजे दोन उमेदवारांचं भवितव्य आहे. मी एक प्रस्थापित गिळलाय, 18 वर्षाचा दुष्काळ संपवलाय, अशी प्रतिक्रिया मराठावा पदविधर मतदारसंघातील निकालानंतर रविराज साबळे यांनी दिली.
मराठवाडा पदवीधर निवडणुक मतमोजणी तिसर्या फेरीअखेरीस विजयी उमेदवार मतांचा कोटा निश्चित झाला होता. विजयी उमेदवारास 88, 558 मतांची आवश्यकता आहे. मात्र, तिसर्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 73,931 मतं मिळाली. महायुतीच्या सतीश चव्हाण यांना 60 हजार 768 मतं मिळाली. त्यामुळे डॉ. प्रतापसिंह पाटील हे जवळपास 13 हजार मतांनी आघाडीवर राहीले. येथील मतदारसंघात तिसर्या क्रमांकावर अपक्ष उमेदवर रविराज साबळे पाटील यांनी शानदार लढत दिली. रविराज साबळे पाटील यांना 20,450 मतं मिळाली आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांना अवघे 8,439 मतं मिळाली आहेत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदाची निवडणूक लक्षवेधी आणि चर्चेची ठरली ती अपक्ष उमेदवार रविराज साबळे पाटील यांच्या उमेदवारीने. एकूण मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंग पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे

