चंद्रपूर विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता यश राऊत यांची निवड

चंद्रपूर विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता यश राऊत यांची निवड

राजु कांबळे 
मिडिया पोलीस टाईम 
वर्धा,नागपूर,अमरावती विभागीय संपादक 

समुद्रपूर. : नुकत्याच जिल्हा स्तर शालेय कबड्डी स्पर्धा देवळी आम. रामदासजी तडस इनडोअर क्रीडा संकुल येथे पार पडल्या. यामध्ये सहभागी जिल्यातील आठ तहसील शाळेचा सहभाग होता. तसेच समुद्रपूर तालुक्याचे कबड्डी खेळाचे प्रतिनिधित्व ( U/19) विकास विद्यालय गिरड या शाळेने केले होते. 

पुढे संपन्न होणाऱ्या विभागीय कबड्डी स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे विकास विद्यालय गिरड येथील विद्यार्थी यश विलास राऊत यांची निवड झाली आहे. यश हा खेळाडू यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य मान.विकास सोनकुसरे साहेब, क्रीडा शिक्षक राजु एन कांबळे कोच सुधीर नेहारे, निखिल तराळे यांना देते.

खेळाडूचे सर्वच स्तरावरून कौतुक आणि अभिनंदन होत आहे तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्त्तर वृंद अभिजित डाखोरे, सुहास चाफले,जाधव मॅडम, उमेश वाणी,आतिश देवतळे,संदीप महाकाळे, सुनील धुळे,रवी गायकवाड,किशोर बारोकर,अर्चना चांगले मॅडम, अंकित तडस, तन्नू गलांडे, प्रणाली गाठे,पौर्णिमा चूटे, संजय गवते, प्रवीण नाईक या सर्वांनी यश ह्या खेळाडूचे , क्रीडा शिक्षक कांबळे,कोच सुधीर नेहारे ,निखिल तराळे या सर्वांचे अभिनंदन केले आहे..
Previous Post Next Post