यावल येथे दुर्गा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत लाजिरवाणी राक्षसी कृत्य.दोन वेगवेगळे गुन्हे दाखल.
नगरसेविकेला तिच्या पतीसह शिवीगाळ तर नगरसेवकावर लोखंडी पट्टीने वार करून जखमी केले.
५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटिल
यावल दि.२३
येथे काल गुरुवार दि.२२ ऑक्टोंबर २०२६ रोजी एकूण ४२ दुर्गा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत लाजिरवाणी "राक्षसी" कृत्य घडल्याने संपूर्ण यावल शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आणि प्रसिद्धी माध्यमातून व्हायरल झालेल्या ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक वापराच्या पत्रावरून तसेच वेळेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.तसेच यावल नगरपरिषद भाजपा सदस्या सौ. सविता नन्नवरे आणि त्यांचे पती विजय नन्नवरे यांना त्यांच्या घरासमोर एकाने शिवीगाळ केल्याने एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याचप्रमाणे उबाठाचे नगरसेवक सागरकुमार सुनील चौधरी यांना चार जणांनी ( एका गुन्ह्यात १ आणि दुसऱ्या गुन्ह्यात चार असे एकूण ५ ) रस्त्यात अडवून मारहाण करून जखमी केल्याने चार जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
ध्वनी प्रदूषण नियमानुसार निर्धारित आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई.?
ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक वापरासाठीच्या वेळेत मर्यादेत सूट मिळणार असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमातून यावल शहरातील दुर्गा मंडळाचे आणि राजकीय,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोणाच्या बळावर व कोणत्या पत्रानुसार केली होती आणि वेळेच्या मर्यादित सूट जाहीर न झाल्याने मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे नकार न दिल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप नेमके कोणामुळे झाले.? याबाबत सुद्धा यावल शहरात चर्चा असून दुर्गा विसर्जन मिरवणुकीत लाजिरवाणी असे राक्षसी कृत्य यावलकरांना दिसून आल्याने तसेच वाजवी पेक्षा जास्त आवाजात अत्याधुनिक वाजंत्री आणि बँड,डीजे, वाजविणाऱ्या विरुद्ध कारवाई काय होणार ..? किव्वा कोणा कोणाच्या प्रभावामुळे सोडून कार्यवाही होणार नाही याबाबत सुद्धा चर्चा आहे.

