कुस्तीच्या आखाड्यात पैलवान अख्तर शेख यांची दमदार एन्ट्री! यावल तालुका संघटकपदी निवड..महाराष्ट्र कुस्ती संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पैलवान अख्तर शेख यांच्याकडे; कुस्ती क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव!.

कुस्तीच्या आखाड्यात पैलवान अख्तर शेख यांची दमदार एन्ट्री! यावल तालुका संघटकपदी निवड..

महाराष्ट्र कुस्ती संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पैलवान अख्तर शेख यांच्याकडे; कुस्ती क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव!.

(रावेर / शेख शरीफ महाराष्ट्र राज्य उपसंपादक)

कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील उदयोन्मुख मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या यावल तालुका संघटकपदी पैलवान अख्तर शेख (फैजपूर) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे फैजपूरसह संपूर्ण यावल तालुक्यातील कुस्तीप्रेमी आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संत्राम भाऊ कांचळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच संघटनात्मक वाटचालीत पैलवान अख्तर शेख यांच्यावर यावल तालुका संघटकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष पैलवान भानुदास विसावे, उपाध्यक्ष पैलवान शकील शेख यांच्यासह संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून यावल तालुक्यातील कुस्तीपटूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील नवोदित मल्लांना प्रोत्साहन देणे, कुस्ती स्पर्धांचे आयोजन, तसेच पारंपरिक कुस्ती संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पैलवान अख्तर शेख निश्चितच प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फैजपूरच्या मातीतून कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देण्याची संधी! पैलवान अख्तर शेख यांच्या निवडीमुळे यावल तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कुस्तीप्रेमींनी व्यक्त केला आहे.
Previous Post Next Post