हिप्परगा थडी जिल्हा परिषद शालेय समिती अध्यक्षपदी सुनील अंजनीकर तर उपाध्यक्ष शेख गौस यांची निवड करण्यात आली.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यात हिप्परगा थडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील अंजनीकर तर उपाध्यक्षपदी शेख गौस यांची सर्व पालक व गावकऱ्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रहेबर इनामदार व प्रमुख पाहुणे पोलीस पाटील शंकराप्पा मठपती माजी सरपंच साहेबराव अंजनीकर होते व उपस्थित माजी सरपंच मियाँ पाटील, उपसरपंच प्रतिनिधी व्यंकट तुकडे, ग्रामपंचायत सदस्य सय्यद एजास व शेख गौस दिवानसाब, पत्रकार मारोती एडकेवार, वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष मुज्जू भाई सय्यद, शिवसेना शाखा अध्यक्ष सय्यद इरफान, भगवान एडकेवार, वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, इम्रान पटेल, दीपक एडकेवार, पत्रकार राजेश आमेटवार, पप्पू महाराज मठवाले, गंगाराम एडकेवार, मरीबा अंजनीकर, साहेबराव एडकेवार,राजु एडकेवार,बालाजी एडकेवार, शिवाजी एडकेवार सर्व गावकरी व पालक व शिक्षक अजय कोंडलवाडे पाटील सर शेवाळकर, गायकवाड सर केसराळीकर, तेली मॅडम उपस्थित होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा जिल्हा परिषद शाळा हिप्परगा थडी तर्फे सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन केंद्रप्रमुख नाईक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सूर्यकांत गायकवाड सर यांनी केले.

