भेसळखोरांविरोधात एफडीएची राज्यव्यापी मोहीम:18 व्यवसायिकांचे परवाने निलंबीत, एक कोटींचा मसाला साठा जब्त.मिठाई, खाद्यतेल, सुकामेवा साठ्यावर कारवई, चार आस्थापनांना सील..

भेसळखोरांविरोधात एफडीएची राज्यव्यापी मोहीम:18 व्यवसायिकांचे परवाने निलंबीत, एक कोटींचा मसाला साठा जब्त.

मिठाई, खाद्यतेल, सुकामेवा साठ्यावर कारवई, चार आस्थापनांना सील..



स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना
सणासूदीच्या काळात खाद्यपदार्थामध्ये होणारी भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (ऋऊअ) राज्यभर विशेष तपासणी मोहिम होती घेतली आहे. मिठाई, खाद्यतेल, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ आणि मसाल्यांच्या विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान भेसळीच्या संशय आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने 18 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, चार आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे. तपासणीत सुमारे 37 लाख 50 हजार रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत एफडीएच्या पथकांनी एकाच वेळी तपासणी मोहीम राबवली. यामध्ये मिठाई उत्पादक, सुकामेवा विक्रेते, दुग्धजन्य पदार्थांचे दुकाने, फरसाण आणि मसाला विक्रेते तसेच खाद्यतेल व्यावसायिकांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, निकृष्ट दर्जाचा माल आणि पॅकिंगवरील माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. 


सांगलीत सुकामेव्याचा मोठा साठा जप्त : सुकामेव्याच्या तपासणी सांगलीतील बाजारपेठ परिसरातून मोठी कारवाई करण्यात आली. येथून 749 किलो बदाम जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 8 लाख 98 हजार 800 रुपये आहे. याशिवाय 128 किलो काजू आणि काजू कणीही जप्त करण्यात आली. या मालाची किंमत 79 हजार 970 रुपये असल्याचे सांगण्यात आले. सांगलीसह आष्टा, तासगाव, रत्नागिरी आणि नवी मुंबई येथेही फरसाण, मिठाई, मसाले,तूप आणि दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली. 


गुटखा, सुगंधित तंबाखूवर कारवाई: प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या साठ्यावविरोधात एफडीएने मोहीम तीव्र केली आहे. कोकण आणि पुणे विभागात टाकलेल्या छाप्यांमध्ये 16 लाख 86 हजार 910 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला या प्रकरणांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 


पुणे विभागात सर्वाधिक परवाने निलंबित : परवाने निलंबित करण्याच्या कारवाईत पुणे विभाग आघाडीवर असून, तेथील सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच, तर अमरावती विभागात दोन आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील अन्य विभागांतील कारवाईसह एकूण 18 व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. चार आस्थापनांना सीलही ठोकण्यात आले आहे. 


एफडीएच्या दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत संशयास्पद खाद्यतेल आणि मसाल्याचंयामोठ्या साठ्याचा मुद्दाही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 48 हजार क्विंटल संशयित साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 28 हाजर क्विंटल खाद्यतेल आणि सुमारे 20 हजार क्विटंल मसाल्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मसाल्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. कारवाईच्या भीतीने सुमारे देान कोटी रुपये किमतीचा मसाला माळरानावर फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. 


खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेशी तडजोड करणार्‍या आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यवसायिकांविरोधात एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे
Previous Post Next Post