सगरोळी येथे मन्नेरवारलू समाजाच्या वतीने क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी.

सगरोळी येथे मन्नेरवारलू समाजाच्या वतीने क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

 नांदेड :बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील मनेरवारलू समाजाच्या वतीने क्रांतिकारक, बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सगरोळी हे नांदेड जिल्ह्यातील मोठी जिल्हा परिषद सर्कल असून पहिल्याच वेळेस सगरोळी येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली, क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी आदिवासी शेतकरी आणि गोरगरीब जनतेसाठी इंग्रजांना, पळो की सळो करून त्यांनी मोठी क्रांती या भारतामध्ये निर्माण केली वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठी क्रांती केली, जंगल ही जीवन आहे हे त्यांनी सातत्याने आदिवासी,व सर्व भारतीयांना सांगितले त्यांची आज जयंती सगरोळी नगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी गावातील मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, व्यंकटराव बामणे, पत्रकार गणेश गिरगावकर, सुरेश गोईनोड,राजू पाटील, बामणे व्यंकट पा, समन, गंगाधर महाजन, माजी सरपंच प्रभू मुत्तेपोड, चिन्नना बुच्चलवार, गोपाळ मुत्तेपोड, गणपत यडलोड दत्तू दम्यायावर व गावातील सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीमध्ये गावातील, सर्व समाजातील सर्व कार्यकर्ते व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post