*छावा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर; महानगराध्यक्षपदी विद्या झनके*

*छावा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर; महानगराध्यक्षपदी विद्या झनके*

जळगाव : छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर महिला आघाडीच्या महानगराध्यक्षपदी विद्या सुभाष झनके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झनके या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव तसेच केंद्रीय शिक्षिका म्हणून कार्यरत असून, गेल्या तीन वर्षांपासून छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर आता महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्ती विषयी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना प्रदान केले आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन जळगाव महानगर महिला आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

*नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :*
महानगर अध्यक्ष : विद्या सुभाष झनके

महानगर उपाध्यक्ष : ममता जावळे, संध्या तायडे, जयश्री सोनवणे, शारदा तायडे

महानगर सचिव : सपना कोळी, वैशाली ठाकूर, ज्योती सिंगनाथ

महानगर सहसचिव : उज्ज्वला सपकाळे, रूपा पाटील, ज्योती खरे

महानगर कार्यकारिणी सदस्य : योगिता सुतार, ऊषा इंगळे, प्रमिला इंगळे, आरती सकट, मीनाक्षी खैरनार, विजया राऊत

कायदेविषयक सल्लागार : ॲड. वनिता शिंपी

महिला संघटन अधिक सक्षम करणे, महिलांना संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभागी करून घेणे तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post