भद्रावतीत पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष* *माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा पत्रपरिषदेत आरोप*

*भद्रावतीत पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष* 
*माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा पत्रपरिषदेत आरोप*

महेश निमसटकर 
ज़िल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

भद्रावती,दि.२२:- भद्रावतीत पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नुकताच पत्रपरिषदेत केला.
      पत्रपरिषदेत धानोरकर यांनी सांगितले की, पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित पावले उचलली जात नाहीत. ऑक्टोबर महिन्यात आमदार करण देवतळे यांनी भद्रावती नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सांगितले होते. मात्र, पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीवर ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले.नगरपरिषद एक दिवसाआड पाणीपुरवठा करणार असेल, तर नागरिकांकडून अर्धे पाणी बिल आकारणार का ? असा सवालही मुख्याधिकारी यांच्याकडे उपस्थित केला होता. मात्र, यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. वरोरा नगरपरिषदेने पाणीटंचाई निवारणासाठी शहरात २४ ट्युबवेल्स उभारल्या. परंतु भद्रावती शहरात तसे कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. शहरातील नळांना तोट्या लावण्यात आल्या नाहीत.त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. नवीन नगराध्यक्ष खुर्चीवर विराजमान होऊन ११ महिने झाले. मात्र नगर परिषदेच्या केवळ ५ सभा झाल्या. वर्धा नदीतील पाण्याची पातळी कमी असल्याने भविष्यात शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शहरातील ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत, त्या परिसरात ट्यूबवेल खोदून पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरून नागरिकांना पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी धानोरकर यांनी पत्रपरिषदेत केली.
      दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर दि.२६ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षांनी पाणीटंचाई व उपाययोजनांबाबत बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले. भविष्यात भद्रावतीकरांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
      पत्रपरिषदेला माजी नगरसेवक प्रशांत डाखरे उपस्थित होते.

Previous Post Next Post