यावल-पुणे दिवाळी साठी जादा बस सेवा

यावल-पुणे दिवाळी साठी जादा बस सेवा

*यावल प्रतिनिधी शकील तडवी

 |* दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यावलकरांची मोठी गैरसोय अखेर दूर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या गटनेत्या नगरसेविका वर्षा निरज चोपडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अवघ्या 48 तासात यश आले असून यावल-पुणे आणि पुणे-यावल मार्गावर जादा बसेस व रातराणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
वर्षा चोपडे यांनी 1 नोव्हेंबर 2026 रोजी यावल आगार व्यवस्थापक व एसटी महामंडळाला लेखी निवेदन देऊन दिवाळीत पुण्याला नोकरी, शिक्षण व व्यवसायासाठी गेलेल्या यावलकरांसाठी जादा बस सोडण्याची मागणी केली होती. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांची होणारी गर्दी व गैरसोय त्यांनी निदर्शनास आणून दिली.
एसटी महामंडळाने तात्काळ दखल घेत 3 नोव्हेंबरपासून सेवा सुरू केली.यावल-पुणे बस सेवा 48 तासात सुरू - नगरसेविका वर्षा चोपडे व महायुतीच्या नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश

यावल आगार 
प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून वर्षा चोपडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*महायुतीची साथ:*
या मागणीला भाजप गटनेत्या नंदाताई महाजन, सविताताई ननवरे, कल्पना वाणी, शुभांगी येवले, उमेश भेगडे, बाळू फेगडे, कादिर
Previous Post Next Post