शहाद्यात बेफाम आय ट्वेंटी कारचा थरार, अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांना चिरडले, अनेक वाहनांचे नुकसान.... ((नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बेफाम झालेल्या आय ट्वेंटी कारने शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक देत फरफटत नेले. यात दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहादा शहरातील जुना मोहिदा रस्त्यावर स्टेट बँक ते स्वामी समर्थ मंदिर दरम्यान हा थरार घडला. पोलिसांनी वेळीच धाव घेत कार चालकास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहादा पोलीस ठाण्यात सुरू होती. मात्र, या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. शहरात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुना मोहिदा रस्त्यावर स्टेट बँक ते श्री स्वामी समर्थ मंदिरा दरम्यान भरधाव वेगाने येत असलेल्या आय ट्वेंटी (क्रमांक एम.एच. 04, ए.क्यू. 6052) कारचा ताबा सुटल्याने सिनेस्टाईल थरार करत अनेक दुचाकी व एका चारचाकी वाहनांला ठोस देत रस्त्यावरून फरफडत नेले. या घटनेत सुमारे 15 ते 20 गाड्यांचे नुकसान झाल्याचे समजते. सिनेस्टाईल गतीने जाणाऱ्या या गाडीकडे सर्वच उपस्थित नागरिक अवाक होवून पाहत होते. या घटनेमुळे सुमारे एक तास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळतात शहादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी नरेंद्र सोनार, भगवान साळवे, गणेश साळवे, छोटू शिरसाठ, महेंद्र शिंदे, रवींद्र सपकाळे, ईश्वर पटले, कपिल मंदील, भाऊसाहेब गिरासे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आय ट्वेंटी कार चालकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची सर्वत्र वार्ता पसरली असून संबंधित वाहन चालकावर शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरु होती.
byMEDIA POLICE TIME
-
0