मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गतिमान व पारदर्शक पद्धतीने राबवावी - मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल===================================राहुल दुगावकर,उपसंपादक जिल्हा नांदेड ===================================महिलांची आर्थिक स्थिती, आरोग्य व पोषणात सुधारणा व्हावी आणि त्यांची कुटुंबात निर्णायक भूमिका मजबूत बनावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक थेट लाभ बँक खात्यात हस्तांतरण होऊन दरमहा पंधराशे रुपये रक्कम दिली जाणार आहे. यात पाच एकर शेतीची अट रद्द करून वयाची अट देखील 65 वर्षे केली आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी आणि गावपातळीवर ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करून घ्यावी आणि त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ९ नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले. त्या हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात दि.4 जुलै रोजी आयोजित तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमातून बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अतिरिक्त मु. का. अ. संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, मु. ले. व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, उ.प.मु.अ.राजकुमार मुक्कावार, उ.प.मु.का.अ.मंजुषा कापसे, रेखा काळप, गटविकास अधिकारी सुधीर मांजरमकर, सहायक गटविकास अधिकारी पि.एम. जाधव आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी तहसील प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला होता.

Previous Post Next Post