अकोली येथे समशान भूमी मध्ये मृतदेह नेत असताना चिखलामुळे भोगावा लागतात मरण यातना. (अजीज खान शहर प्रतिनिधी यवतमाळ ढाणकी) उमरखेड तालुक्यातील अकोली या गावात चांगले रस्ते नसल्यामुळे नागरिकांना अनेक यातना सहन करावा लागत आहे. त्यातच कुणाचा मृत्यू जर झाला तर, गुडघ्याभर चिखलातून रस्ता काढून मृतदेह हा न्यावा लागतो. अकोली येथील साधना आकाश सोळंके वय २९ वर्षे या महिलेचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. संसाराचा गाडा सुरळीत चालू असताना दोन अपत्य झाली. मोठा संकेत तर लहान अनिकेत संकेत चे वय सात वर्ष तर अनिकेतचे अडीच वर्षे असा सुखी संसाराचा गाडा चालत असतानाच नियतीला तो मान्य नव्हता अचानक काळाने घाला घातला व साधनाचे अल्पशा आजाराने ३०/०७/२०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे सोळंके परिवारावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.त्याबद्दल संपूर्ण गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जीवन जगत असताना माणूस अनेक यातना सहन करतो परंतु मेल्यानंतर सुद्धा समशानभूमीमध्ये मृतदेह नेत असताना सुद्धा कुटुंब, गावातील नागरिक,व पाहुनी मंडळींना अनेक मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे गावाचा विकास किती आहे हे दिसून येते . "लोकप्रतिनिधी पुढारी नावाला रस्ता नाही गावाला" अशा संतप्त प्रतिक्रिया अकोली येथील नागरिकांच्या दिसून येत आहेत. गुडघ्याभर चिखलातून व साचलेल्या पाण्यातून मार्ग काढून स्मशानभूमीमध्ये मृतदेह न्यावा लागतो. अंत्यविधीला आलेली पाहुणे मंडळी सुद्धा गावाच्या विकासाबद्दल संशय व्यक्त करीत आहे.अकोली या ग्रामपंचायतला शासनाने निर्मल ग्राम पुरस्काराने २००९ साली सन्मानित केले. परंतु अकोली या गावाचा विकास सध्याच्या समशान भूमी कडे जाणारा रस्ता व दळणवळणाच्या रस्त्यातून दिसून पडतो. बऱ्याच लोकप्रतिनिधी गावाच्या विकासाबद्दल मोठ-मोठे आश्वासन दिले परंतु २००९ ला जो पुरस्कार मिळाला त्यातून दिसून पडते की, गावच्या राजकारणाची लाथाडीचे हवेदेवे कसे आहेत ते उमटून पडतात. वृत्तपत्रांमध्ये अनेक वेळा रस्त्याविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या परंतु प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. आता तरी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी, जनाची नाही तर नाही किमान मनाची तरी लाज बाळगतील का? मृतदेह हा गुडघ्याभर चिखलातून नेत असलेले पाहून प्रशासनाला जाग येईल का? अशा लोकप्रतिनिधींना होणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची यांना जागा दाखवून देऊ? अशा संतप्त प्रतिक्रिया आकोली येथील नागरिकांच्या दिसून येत आहे . प्रशासन आता तरी या गंभीर समस्येची दखल घेऊन अकोली गावातील रस्ते चांगले करतील का? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0