हिंगणघाट : डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुका पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार हिंगणघाट नगरपरिषदेतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील जाम–हैदराबाद मार्गावर, रिमडोह येथील मोठ्या मारुती मंदिरासमोर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे.हे चेक पोस्ट २४ तास कार्यरत असल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या अवैध धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी पर्यायी मार्गांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.या चेकपोस्टवर नगरपरिषद प्रशासनाचे तीन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी अशी एकूण चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक प्रामाणिकपणे तपासणीचे कार्य बजावत आहे.दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी जाम–हिंगणघाट रोडवरील तपासणीदरम्यान एस.टी. महामंडळाची एमएच 14 एमएच 5241 ही बस तपासण्यात आली. यावेळी एका प्रवाशाजवळील बॅगेत रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू आढळून आली. त्यात दोन लिटरचे दोन बंपर व 180 एमएलची एक निप असा एकूण 4 लिटर 180 एमएल दारू मिळून आली. मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹8,400 एवढी आहे.सदर इसमाने आपले नाव कमलेश गुलाबराव भगत (वय 49, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी त्यास एफएसटी पथक व हिंगणघाट पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले.Hingnghatnews /ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक ठाणेदार हिंगणघाट, एफएसटी पथकातील निवडणूक नोडल अधिकारी अमर मनालाल रेवते, सहाय्यक नोडल अधिकारी महेंद्र शर्मा, पोलीस हवालदार प्रवीण बावणे (पोलीस स्टेशन हिंगणघाट) तसेच एसएसटी पथकातील सोमनाथ विठ्ठल जाधव, संजय दुबे, बाळकृष्ण सातपुते व पोलीस शिपाई कृष्णा माने यांच्या संयुक्त कार्यवाहीत करण्यात आली.या प्रकरणी अपराध क्रमांक 17/19/2025 नुसार दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0