*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तर्फे सपोनि विशाल पाटील यांचा सत्कार*. (जळगांव जिल्हा प्रतिनिधी: विनोद कोळी (शिवा भाई G)सावदा पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले सपोनी विशाल पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना शाखा रावेर तर्फे भेट घेऊन सत्कार करण्यात आले. सविस्तर असे की,सावदा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने त्याच्या रिक्त जागी सहायक पोलीस निरिक्षक विशाल पाटील यांची नियुक्ती झाली तसेच सपोनि विशाल पाटील यांनी दि.२ जुलै रोजी सावदा पोलीस स्थानकात पदभार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना मुंबई शाखा रावेर तर्फे त्यांचा दि.४ जुलै रोजी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना संघटनेचे रावेर तालुका सचिव इकबाल पिंजारी यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.यावेळी संघटनेचे विभागीय प्रसिध्दी प्रमुख विनोद कोळी(शिवाभाईG),तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे,सचिव इकबाल पिंजारी,ज्येष्ठ सदस्य संजीव चौधरी, ता.प्रसिध्दी प्रमुख राजेश चौधरी(राज सर) तसेच सदस्य प्रदीप कुलकर्णी हे उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0