पाडळसे जवळ बस व मोटरसायकलचा अपघात दोन जखमी एक ठार. (पाडळसे प्रतिनिधी ) :- रविवार संध्याकाळी4.30ते 4.45 च्या दरम्यान फैजपूर भुसावळ रोड वरील पाडळसा गावा नजीक वळणावर, मराठा मटण हॉटेल जवळ मोटरसायकल ( बुलेट ) क्रमांक एम.एच.१९ इ.एफ.७७०४ व एस.टी.बस क्रमांक एम.एच.१४ एम.एच.१०८३ नंबर ची बसचा समोरासमोर धडस झाली. यामध्ये मोटर सायकल वर तीन जण स्वार होते.त्यामधील मयूर श्रीराम गवळी जागीच ठार झाला. तर जयेश सुधाकर पाटील व चिरायू मनोज गोहर या दोघा जखमींना जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. त्यातील एक जण मृत्यूशी झुंज देत आहे.सदर एस. टी. बस. ही रावेर डेपोची असून पुणे वरून रावेरला जात होती. तर मोटर सायकल ( बुलेट ) ही फैजपूर वरून भुसावळ कडे जात असतांना अपघात झाला. अपघातात मयूर श्रीराम गवळी वय ३० मयत झालेला आहे. तसेच मयत आणि दोघे जखमी शिवाजी नगर जळगाव येथील रहिवासी आहे. सदरील घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी यावर्षात सात ते आठ वेगवेगळ्या अपघातात लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.पाडळसा गावाजवळील वळणावर अपघाताच्या घटना घडत आहे त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. सदर अपघाता ठिकाणी एस.टी आगर संबंधीत अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
byMEDIA POLICE TIME
-
0