चाळीसगांव शहर पो.स्टे. हद्दीतील तडीपार गुंड जगदीश महाजन यास अटक (चाळीसगाव प्रतिनिधी) मा वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन हद्दीत तडीपार ( हद्दपार ) इसमांवर नजर ठेवून ते मिळून आल्यास कार्यवाही चाळीसगाव शहर पो स्टे तर्फे करण्यात येते ..आज रोजी पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांनी पो.स्टे. हद्दीतील हद्दपार व गुन्हेगारांना चेक करण्याकामी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार रवाना केले होते. त्यादरम्यान आज दिनांक 04/08/2024 रोजी पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांना माहीती प्राप्त झाली की, चाळीसगांव शहर तसेच जळगांव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेला इसम नामे जगदीश जगन्नाथ महाजन रा. नेताजी चौक, चाळीसगांव हा विना परवानगी चाळीसगांव शहरात फिरत आहे. तरी त्यास ताब्यात घेणेकामी पोलीस पथक पाठविले असता तो चाळीसगांव शहरातील वसंत डेअरी जवळ मिळुन आला. त्यावेळी त्यास पोलीस उपनिरीक्षक, योगेश माळी व पोकॉ/पवन पाटील, रविंद्र बच्छे, गोपाल पाटील अशांनी ताब्यात घेतले असता हद्दपार ईसम नामे जगदीश महाजन याने सदर ठिकाणी विनाकारण आरडा-ओरड व पोलीसांना अरेरावी करुन, पोलीस स्टाफसोबत धक्काबुक्की व दमदाटी केली. त्यावेळी नमुद पोलीस स्टाफने त्यास पळुन जाण्याची संधी न देता ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्याच्यावर भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 132, 121(1), 351(3), 352 सह महा.पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्ह्यात जगदीश महाजन यास अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील व पोहेकॉ/विनोद भोई हे करीत आहेत. आरोपी जगदीश महाजन हा सवयीचा गुन्हेगार असून त्यावर शरीराविरुद्धचे व अंमली पदार्थ अवैद्य मार्गाने विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत ..( संदीप पाटील )पोलीस निरीक्षकचाळीसगाव शहर पो स्टे
byMEDIA POLICE TIME
-
0