आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत -संतोष दिवाण. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी) परभणी. सेलूत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा.सेलू : दि.09 विद्या र्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्या साठी सतत प्रयत्न करावेत. तसेच शिक्षकांच्या मेहनतीचे चीज करावे, त्यासाठी अविरत श्रम करावे, असे आवाहन पाथरी येथील शंकरराव चव्हा ण मुख्याध्यापक संतोष दिवाण यांनी केले.सेलू येथील केशवराज विद्यालयातील दहावी तील गुणवंत तसेच विभागातील विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संतोष दिवाण यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव महेशराव खारकर, संस्थापक सदस्य अशोकराव चामणीकर, मुख्याध्या पक सिद्धार्थ एडके, बालासाहेब हळणे यांच्यासह सन्मानीय संचालक जयंतराव दिग्रसकर, अ‍ॅड. किशोर जवळेकर, विषुपंत शेरे, प्रवीण माणकेश्‍वर यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना दिवाण म्हणाले की, नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. तसेच पारितो षिक मिळालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे.विद्या र्थ्यांनी आपले ध्येय ठरवले पाहिजे व शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रयत्न, त्याग व संघर्ष या त्रिसूत्रीवरच विद्या र्थ्यांचे यश अवलंबून आहे, असे नमूद करीत विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच व्यावहारिक ज्ञान देखील अवगत करावे. प्रत्येकाला वय वाढल्यानंतर आपल्या मध्ये असलेली क्षमता पूर्ण करण्याची जबाब दारी स्वतःलाच पूर्ण करावी लागते, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी व तसे ध्येय ठेऊन प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. विद्या र्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा. पूर्वीच्या चांदव्याची जागा आता मोबाईल मधील बडबड गीताने घेतली आहे, ही बाब अत्यंत घातक आहे, याची जाणीव पाल कांनी ठेवावी. तसेच सुसंस्कारित पिढी तयार व्हावी ही काळा ची गरज आहे. ज्ञान व आरोग्य संपन्न असे जीवन विद्यार्थ्यानी जगले पाहिजे. कारण गुणातून व मिळवलेल्या ज्ञानातूनच विद्यार्थ्यांची खरी पात्रता घडत असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच एखादी कला अवगत करावी. कारण त्यातून च रोजगार उपलब्ध करता येऊ शकतो. कारण सर्वांनाच नौकरी मिळू शकणार नाही. शिक्षकांनी देखील केवळ शिक्षक न राहता विद्यार्थ्यांचे पालक बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. योगेश ढवारे यांनी यादी वाचन केले. सिद्धार्थ एडके यांनी प्रास्ताविकात कार्य क्रमाचा उद्देश स्पष्ट केला. महेशराव खारकर, अशोकराव चामणीकर यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले तर योगेश ढवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.दरम्यान, पुढील वर्षी गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेणार्‍या विद्यार्थ्यास 3001 रुपयांचे परितोषक संतोष दिवाण यांनी यावेळी जाहीर केले. तर दरवर्षी दहावी परीक्षेत शाळे तून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास 2001 रुपयांचे परितोषक जेष्ठ पत्रकार नारायण पाटी ल यांनी यावेळी जाहीर केले.

Previous Post Next Post