डोंगरगावच्या सरस्वती आणि मुक्ताई विद्यालयात आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम... (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : डोंगरगाव, ता. शहादा येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर व मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी सत्तारसिंग वळवी, विरेंद्र वळवी, समजिक कार्यकर्त्या अनामिका चौधरी, संस्थेच्या सचिव सौ. मुक्ताताई पाटील, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका शर्मिला पाटील व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर अनामिका चौधरी यांनी आदिवासी संस्कृती व आदिवासी दिनाची सुरुवात कशी झाली याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विर एकलव्य,जननायक बिरसा मुंडा यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी व सहभागी विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर पारंपरिक नृत्य सादर केले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
byMEDIA POLICE TIME
-
0