बंधारा शाळेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न .. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )तळोदा तालुक्यातील प्रतापपुर केंद्रात शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंधारा येथे खर्डी,गाढवली,अलवान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली या शिक्षण परिषद अध्यक्ष म्हणून प्रतापपुर केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे होत्या निरीक्षण म्हणून जग सगळंदिश मराठे व अरुण जयस्वाल यांनी काम पाहिले प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर ठाकरे, नितीन कुमार ठाकरे, मालती मोरे, सरीता मोरे, देवसिंग पवार,लालसिंग मोरे उपस्थित होते.केद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनींनी ईशस्तनव व स्वागत गीत गायीले सहभागी मुलींचे कैतुक करण्यात आले. शिक्षण परिषदेची सुरवात होण्याआधी सर्व मान्यवरांचे सन्मान करण्यात आले शिक्षक परिषदेत मागील शैक्षणिक वर्षातील मागोवा केंद्रीयप्रमुख रंजना निकुंभ यांनी प्रशासकीय माहिती व त्यासोबत काही सुचना दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर वेंदे यांनी तर उपस्थितांचे आभार किशोर भारती यांनी मानले या शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र कोळी,दयाराम वसावे, दिनेश सोनवणे, मनीषा गोसावी यांनी अथक परिश्रम घेतले शिक्षक परिषद खेळीमेळीच्या वातावरण व उत्साहात पार पडली
byMEDIA POLICE TIME
-
0