जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक झाले सेट पास. (राहुल दुगावकर नांदेड जिल्हा उपसंपादक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी ता. बिलोली येथील प्राथमिक शिक्षक राजू गौतम भद्रे हे 2024 ची महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पास झाले आहेत. ते मूळचे हुनगुंदा या गावाचे रहिवाशी असून खडतर परिस्थितीतुन अवघ्या 22 व्या वर्षी प्राथमिक शिक्षक झाले. नंतर मुक्त विद्यापीठात पदवी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी राज्यशास्त्र विषयात मिळवली. सद्या ते स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड अंतर्गत पीपल्स महाविद्यालय नांदेड या संशोधन केंद्रात राज्यशास्त्र विषयात डॉ. आर जे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली RTE 25 % आरक्षणाची अंमलबजावणी व परिणामकारकता या विषयात पी एच डी करत आहेत. सरांच्या यशाबद्दल पानसरे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ बैलखेडे व डॉ गायकवाड, डॉ भद्रे, डॉ शिवशेट्टे व शुद्धोधन गायकवाड सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा. पाटील साहेब, विस्तार अधिकारी बिरमवार सर, केंद्रप्रमुख कौटकर सर, शाळेतील स्टाफ, सावळी शाळेचा स्टाफ, शिक्षक मित्र सोनकांबळे सर, शीतल भालेकर व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लाखे यांनी अभिनंदन केले.

Previous Post Next Post