श्री सत्यसाई सेवा संघटना जळगाव अंतर्गत श्री सत्यसाई सेवा समिती बोरखेडा येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर संपन्न...... रावेर तालुका प्रतिनिधी (रशीद तडवी)आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी श्री सत्यसाई सेवा संघटना जळगाव आणि तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने श्री सत्यसाई सेवा समिती बोरखेडा रावेर मोरगाव आणि शिंदखेडा यांनी संयुक्तपणे मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बोरखेडा येथे केले होतेत्यात एकूण 126 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 61पेशंट यांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी रेफर करण्यात आलेत्यापैकी 24 पेशंट आज ऑपरेशन साठी तुलसीआय हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आले आणि उरलेले 37 पेशंट उद्या ऑपरेशन साठी तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात येणार आहेतमहानारायण सेवा ही करण्यात आली त्यात सकाळी सर्व पेशंट नातेवाईक सेवादल व सर्वांना चहा नाश्ता आणि तपासणी नंतर सर्वांना जेवण देण्यात आले तसेच प्रवासात सर्व पेशंट यांना पाणी बाॅटल व बिस्किटे व चहा देण्यात आलातसेच पेशंटला घेऊन जाणे राहणे जेवण व आॅपरेशन नंतर घरी सोडणे सर्व खर्च संघटना करणार आहेया आय कॅम्प साठी श्री सत्य साई सेवा संघटना जळगावचे जिल्हाध्यक्ष नितीन जैन राज्य नारायण सेवा प्रमुख सुनील पाटील जिल्हा बालविकास प्रमुख विजय गोसावी जिल्हा अध्यात्मिक प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा युवा तथा मीडिया प्रमुख पंकज पाटील बोरखेडा समितीचे श्री शांताराम पाटील बोरखेड्याचे पोलीस पाटील अरुण पाटील व समिती अध्यक्ष नितीन पाटील रावेर समिती अध्यक्ष लिलाधर महाजन मोरगाव समिती अध्यक्ष अरुण चौधरी व युवा प्रमुख वैभव चौधरी ,शिंदखेडा युवाप्रमुख चेतन पाटील , मालती महाजन, ममता पाटील, गायत्री गोसावी, माधुरी चौधरी तसेच सर्व समितीचे अध्यक्ष ,तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर श्री श्रीकांत सुरळकर आणि त्यांची सर्व टीम तसेच सर्व समितीचे सदस्य श्री सत्यसाई बालविकास चे विद्यार्थी व पालक व सर्व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली
byMEDIA POLICE TIME
-
0