म.रा.पत्रकार संघाची रावेर तालुका कार्यकारिणी गठित..नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे ग्रा.जिल्हाध्यक्ष हस्ते सत्कार रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी - दि.8 विनायक जहुरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राचेर तालुका ची बैठक दि.4 ऑगस्ट रविवार रोजी सावदा रेस्ट हाऊस येथे तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली..यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष जी नवले, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा सचिव इकबाल पिंजारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. ती पुढीप्रमाणे..रवींद्र महाजन तालुका अध्यक्ष , सुमित पाटील ता. उपाध्यक्ष, विजय अवसरमल कार्याध्यक्ष, विनायक जहुरे सचिव, आशिष चौधरी सहचिव, सादिक पिंजारी संघटक, विजय का.अवसरमल सहसंघटक , प्रमोद कोंडे मार्गदर्शक, संजीव चौधरी सल्लागार, प्रभाकर महाजन सहसल्लगर, रुपेश इंगळे प्रसिध्दी प्रमुख या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य यांचा ग्रा.जिल्हाध्यक्ष यांचे हस्ते पुषपगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सदर प्रास्तविक इकबाल पिंजारी, यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. दिलीप सोनवणे यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0