चंद्रपूर जिल्हाप्रमुख तथा ट्रस्ट संस्थापक रविंद्र शिंदे यांनी घेतले विभक्त कुटुंबातील मुलीला शैक्षणिक दत्तककुमारी तमन्ना पित्तकर हिच पुढील शिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून साकारणारप्रा. धनराज आस्वले... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर ) भद्रावती दि.9:- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे उपक्रम “स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत संस्थापक रविंद्र शिंदे यांनी चंद्रपूर येथील 7व्या वर्गात शिक्षण घेत असलेली कुमारी तमन्ना सरीता पित्तकर हिला शैक्षणिक दत्तक घेत शैक्षणिक साहित्य वितरीत केले. विभक्त कुटुंबातील तमन्ना हीचे पुढील सर्व शिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून साकार केले जाईल असे ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी सांगीतले.याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्षा सुषमाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे, रोशन भोयर, मारोती नागपुरे, मंगेश लेडांने, वैभव पावडे आदी उपस्थित होते*.

Previous Post Next Post