जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तपदी बदली; नवीन जिल्हाधिकाऱ्यांची प्रतीक्षा... (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली आज झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. श्रीमती खत्री या गत तीन वर्षापासून नंदुरबार जिल्हाधिकारीपदी कार्यरत होत्या. आज दि. 9 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांना तातडीने नवीन जागेवरील पदभार घेण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नसल्याने नाशिक येथील महसूल आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम अधिकाऱ्यांकडे पदभार सोपविण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

Previous Post Next Post