शहादा पोलिसांची धडक कारवाई; सुका गांजा आणि दारू तस्करांविरोधात गुन्हा दखल, सुमारे पावणे चार लाखांचा ऐवज जप्त.. .(नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : शहादा पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात शहादा-खेतिया रस्त्यावरील दरा फाट्याजवळील पोलीस चौकीजवळ पोलीसांनी 93 हजार 300 रुपयांचा सुका गांजा जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत तालुक्यातील मंदाणा-दामळदा रस्त्यावरील चिखली फाट्याजवळ पिकअप वाहनातूनी दारूची चोरटी करणाऱ्या वाहनासह सुमारे 2 लाख 64 हजार 356 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरूध्द शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही प्रकरणी सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 ऑगस्टच्या रात्री १० वाजेच्या सुमारास शहादा-खेतिया रस्त्यावरील दरा फाट्याजवळील पोलीस चौकीजवळ युवराज गिधा पवार वय 28 वर्ष, फुलसिंग कोचऱ्या वळवी वय 41 वर्ष दोन्ही रा. धावलघाट ता. धडगाव हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलीवर मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाची वाहतुक करतांना आढळून आले. त्यांच्याकडे 93 हजार 300 रुपये किंमतीचा 6 किलो 220 ग्रॅम वजनाचा सुका गांजा व 20 हजाराची हिरो कंपनीची मोटरसायकल क्र. एमएच 39 एके 9486 असा एकुण 1 लाख 13 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत पोलीस शिपाई अमृत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत. तर दुसऱ्या कारवाईत दि. 7 ऑगस्टच्या रात्री 8.45 वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या पिकअप वाहनातून दारूची वाहतूक आढळून आली. यात 64 हजार 365 रूपये किंमतीची देशी टॅगोपंच व 2 लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची मॅक्स पिकअप वाहन असा एकुण 2 लाख 64 हजार 356 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी मिथुन सुभाष सिसोदे यांच्या फिर्यादीवरून नवाजखॉ पिंजारी (वय 32, गडधदेव ता. शिरपूर), शांत्या पूर्ण नाव माहित नाही (रा. लक्कडकोट ता. शहादा), संजय जोगट्या पावरा (रा. गदडदेव ता. शिरपूर), आरीफ सैय्यद आरीफ बाबा पुर्ण नाव माहित नाही (रा. खेतिया ता. पानसेमल जि.बडवानी) या चार जणांविरूध्द शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत.

Previous Post Next Post