भूमिपुत्र संघटनेच्या वतीने वाड्यात भव्य रॅली........ (वाडा:पालघर विभागीय संपादक)9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जात असून त्या निमित्त भूमिपुत्र संघटनेच्या वतीने वाड्यात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी (दि.९ ) सकाळी खण्डेश्वरी नाका येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये लहानथोर मुले-मुली महिला व प्रामुख्याने वयोवृद्धांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता खण्डेश्वरी नाकायेथून निघालेली रॅली वाडा बस स्थानक, मुख्य बाजारपेठ, विठ्ठल मंदिर, पंचायत समिती कार्यालय या मार्गाने काढण्यात आली. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रीतीने केलेला उत्कृष्ट तारपा नृत्य सर्वात आकर्षण ठरला. या प्रसंगी आदिवासी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधव-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्यांना पुष्प देऊन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post