वाड्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न...... (वाडा:पालघर विभागीय संपादक)जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी विश्व आदिवासी दिवस घोषित केला. तेंव्हापासून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. वाडा तालुक्यातील समाज बांधवांकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.९ऑगस्ट) संयुक्त उत्सव कमिटीच्या वतीने खण्डेश्वरी नाका येथे आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार सन्मान करण्यात आला त्या नंतर रॅली काढण्यात आली. या रॅलीत समाजातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.खंडेश्वरी नाका ते पंचायत समिती कार्यालय या दरम्यान पारंपरिक वेशभूषेत रॅली काढण्यात आली. पंचायत समिती येथे संविधान स्थंबाला अभिवादन करून रॅलीचे समापण करण्यात आले.संयुक्त उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह अनंता वणगा, संतोष साठे, गणेश बाराठे, दिनेश पथवा , कल्पेश ठाणगे आदींनी प्रामुख्याने उपस्थित राहून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0