शॉर्टसर्किट मुळे स्कुटर जळून खाक.. (वाडा:वार्ताहर)वाडा तालुक्यातील पिक येथील रहिवासी विक्रांत पाटील हे मंगळवारी (दि.५ ) आपल्या ज्यूपिटर या स्कुटर वरून घराच्या दिशेने जात असताना धावत्या स्कुटरने अचानाक पेट घेतला, पाटील यांनी तात्काळ गाडी सोडून ते बाजूला धावले दरम्यान बघता बघता गाडी जळून राख झाली होती.वाड्यापासून काहीच अंतरावर वाडा मलवाडा या मार्गावरील खादानी समोर ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत स्कुटर पूर्णतःहा जळून राख झाली आहे.पाटील यांचे या घटनेत आतोनात नुकसान झाले असून सुदैवाने यात चालक सुखरूप आहे. शॉकसर्किट मुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0