पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न... (वाडा:वार्ताहर)दिवसेंदिवस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढत्या कामाचा तान व आरोग्य समस्या पाहता आयडियल हॉस्पिटल, पोशेरी यांच्या सहकाऱ्याने वाडा पोलीस ठाणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरात रक्तदाब, मधुनेह सह इतर आजारांची तपासणी करून योग्य औषोधोपचार दिले.या शिबिरात उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी शिबिराचा लाभ घेतला तर पोशेरी येथील आयडियल हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.
byMEDIA POLICE TIME
-
0