अमोल तुपेकर यांची काँग्रेस शहर अध्यक्षपदी पुनश्च एकदा फेर निवड...... (अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी यवतमाळ ) ढाणकी शहरातील अमोल तुपेकर यांनी काँग्रेसची धुरा अत्यंत प्रामाणिक व सोज्वळपणाने अनेकवेळी महत्त्वपूर्ण कामगिरी करत त्यांनी ढाणकी शहर अध्यक्ष असते वेळी तन-मन-धनाने काँग्रेसचे काम करून सामाजिक सलोखा जपत , अनेक सामाजिक काम करून तरुण युवा पिढीचे प्रतिनिधित्व करून युवा वर्ग,व अनेक कार्यकर्त्यांची मोट बांधली. तसेच ज्येष्ठ व शहरातील अनेक नागरिका सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पक्ष बळकटीसाठी शहरात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून त्यांच्यावर परत विश्वास ठेवत पक्षश्रेष्ठींनी ढाणकी काँग्रेस शहराध्यक्ष पदाची धुरा परत सोपवली. त्यामुळे ढाणकी शहरातूनच नव्हे तर उमरखेड तालुका व आजूबाजूच्या ग्रामीण भागातून त्यांच्यावर अभिनंदननांचा वर्षाव होत आहे. याचे श्रेय ते काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व युवा कार्यकर्त्यांना देत आहे.

Previous Post Next Post