जिओ व बीएसएनएल नेटवर्क समस्या कायम सुरळीत चालू करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून तोडफोड करण्यात येईल.. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )अक्राणी तालुक्यात नेटवर्कची समस्या ही कायम असून ती सुरळीत करण्यात यावी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच कामे ही ऑनलाईन पद्धतीने केली जात असताना बँकिंग व्यवहार नोकरी संदर्भातील फार्म विद्यार्थीचे प्रवेश अर्ज असतील असे बरेच विभागाचे कामे ही ऑनलाईन पद्धतीने होत असताना अनेक विद्यार्थीचे भविष्य संपुष्टात येण्याचे नाकारता येत नाही नेटवर्क साठी ग्राहकांना २९९ ते ३४९ आघाऊ रक्कम आकारनी दिलेली असतात नेटवर्क वांरवार खंडित करण्यात येत असते तरी संबंधित दुरसंसार कंपनीच्या मालकांना सदर विषयी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी कडून जिओ व बीएसएनएल चे टावर तोडफोड करण्यात येईल नुकसानीची संपुर्ण जबाबदारी सदर कंपनीचे मालक यांची असेल असे निवेदनात करण्यात आले आहे यावेळी उपस्थित मनसे अक्राणी तालुका अध्यक्ष संतोष फेंदा पावरा, मनसे उपाध्यक्ष दिपक सेवल्या पावरा, सचिव मनसे तालुका सुदाम शिवाजी पावरा, किसन पावरा, इंजिनिअर सागर पावरा आदि होते.

Previous Post Next Post