लोकमंच व विचारधारा फाउंडेशन भारतीय संविधान या विषयावर शिबीर घेण्यात आले... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )लोकमंच व विचारधारा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांमार्फत अक्राणी तालुक्यातील सुर्यपुर येथे कम्युनिटी लिडस याचे भारतीय संविधान या विषयावर प्रबोधन शिबीर घेण्यात आले. शिबीरात विचारधारा फाउंडेशनचे संचालक तात्याजी पवार सर यांनी राज्यघटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकशाही व सर्व समभाव इत्यादी मुल्यांचे स्पष्टीकरण घेऊन भारतीय संविधानात नमूद असलेल्या नागरिकांनाचे मुलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत माहिती दिली. सुशिक्षित आदिवासी तरुणांनी भारतीय संविधान समजुन घेत त्यांची व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात अंमलबजावणी करावी व इतरांना देखील संविधान समजावून सांगितले तर आदिवासी समाज जागृत होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला गती प्राप्त होईल अशी आशाही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. संस्थेमार्फत शिबीर निवडक कम्युनिटी लिडसना भारतीय संविधान हे पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आले. प्रबोधन शिबीरात चुलवड येथील उपसरपंच राजेंद्र पावरा,गैऱ्या येथील सामाजिक कार्यकर्ते कुवरसिंग पराडके,बोदला येथील डॉ.भरत वळवी, तसेच आचपा व भोगवाडे खुर्द येथील युवक सत्तरसिंग पावरा,दीपक पावरा इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच इतर युवकांना थोडा वेळ काढून समाजाला जागृत करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणें परिसरातील गावांमध्ये लोकजागृतीसाठी दरमहा बैठकांचे आयोजन करण्याचें निर्णयही सर्व कम्युनिटी लिडसनी एकमताने घेतला शिबीरात सुर्यपुर,कोमोद खुर्द,बोदला,मनखेडी बुद्रुक, आचपा,नवागाव,गैऱ्या,खरवड, कुसुमवेरी व भोगवाडे खुर्द इत्यादी गावातील सुमारे २५ युवकांनी सहभाग घेतला.शिबीराच्या यशस्वीतेसाठी विचारधारा फाउंडेशनचे राहुल पावरा यांनी परीश्रम घेतले ‌

Previous Post Next Post