देगलूर-बिलोली विधानसभा निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीने लढणार -दिलीपराव शिंदे.. 💚(राहुल दुगावकर उपसंपादक, नांदेड )देगलूर -बिलोली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असून हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) संपूर्ण ताकदीने लढणार असल्याने शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक दिलीपराव शिंदे यांनी बिलोली येथे आयोजित शिवसेनीकांच्या आढावा बैठकीत केले.बिलोली शहरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम,बिलोली तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे, युवासेना जिल्हाप्रमुख ओमप्रकाश धुप्पेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. अर्चना गंगाधर शिंदे, उमाकांत बादेवाड, कुंडलवाडी शहरप्रमुख लक्ष्मण गंगोणे, बिलोली शहरप्रमुख श्रीकांत गादगे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. शिलाताई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या आढावा बैठकीला युवासेना तालुकाप्रमुख अरविंद पवनकर, मारोती पाटील, सुधाकर पांचाळ, अंकुश हिवराळे,राम पाटील केसराळीकर,गंगाधर शिंदे,चंद्रशेखर भोरे,महंमद इस्माईल,सुनील भास्करे, विक्की सोनकांबळे, सुरज जाधव यांच्यासह कुंडलवाडी, बिलोली व ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.-----------------------------------------------*देगलूर-बिलोली मतदारसंघ शिवसेनेला सुटणार - उमेश मुंडे*देगलूर -बिलोली विधानसभा मतदारसंघावार शिवसेना शिंदे गटाने दावा केला असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं या मतदारसंघावार विशेष लक्ष असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेलाच सुटणार असल्याचे मत जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.----------------------------------=-----------*देगलूर-बिलोली मतदारसंघावार शिवसेनेचा झेंडा फडकणार -मंगेश कदम*देगलूर-बिलोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठया प्रमाणात वाढली असून आम्ही तळागळातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष संघटन मजबूत करीत असल्याने शिवसैनिकांत मोठा उत्साह आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसैनिक जोमाने कामाला लागल्याने या मतदारसंघावर नक्कीच शिवसेनेचा झेंडा फडकेल असे मत एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी व्यक्त केले.

Previous Post Next Post