जिंतूर तालुक्यातील विस गावाच्या सरपंचां नी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी) . सुरेश नागरे यांच्या उपस्थित प्रवेश. जिंतूर : दि.05 नोव्हेंबर रोजी सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूर तालुक्यातील 20 गावच्या भारतीय जनता पार्टीच्या व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सरपंचां नी सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये बाळासाहेब घुगे मा. जि. प.सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतुर संचालक सरपंच सायखेडा गजानन वराड, मा. पंचायत समिती सदस्य केशवराव घुले, सुधाकरराव घुगे सरपंच शेवडी, संजय घुले सरपंच मानमोडी, भारत घुगे सरपंच, भास्कर नागरे माजी सरपंच, उमेश दराडे सरपंच लिंबाळा, उद्धव राव दराडे सरपंच चिंचोली, जगन काळे माजी सरपंच देवसडी, प्रभाकर आघाव सरपंच आघाव वाडी, गणेश पवार सरपंच सावरगाव तांडा, श्रीकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य अंगलगाव, अनिल लांडगे सरपंच गणपुर, उद्धव काळे ग्राम पंचायत सदस्य देवसडी, दिलीप मते मराठवाडा कामगार संघटना सचिव वझर, गंगाधर आघाव ग्राम पंचायत सदस्य बेलखे डा, शिवाजीराव घुगे सरपंच कान्हा, अंकुश घुगे कान्हा, आदी गावच्या सरपंचांनी सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी नानासाहेब राऊत, प्रसादराव बुधवंत, राजेश चव्हाण, राजेंद्र नागरे, अविनाश काळे, केशवराव बुधवंत, पंडितराव घोलप,तहसीन देशमुख, आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0