शिवसेना शिंदे गट उमरखेड शहर उपप्रमुख पदी दामोदर इंगोले यांची नियुक्ती. (अतिश वटाणे तालुका प्रतिनिधी उमरखेड) उमरखेड विधानसभा मतदारसंघात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा झांजावात व या पक्षाची ओळख उमरखेड विधानसभा मतदारसंघात थोड्याच वेळात निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते दामोदर इंगोले यांनी नुकताच एडवोकेट संजय जाधव शहर अध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत जाऊन उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती मिळवली आहे . एक तरुण तडफदार व हाडाचा कार्यकर्ता म्हणून दामोदर इंगळे यांच्याकडे पाहिले जाते . काही दिवसांमध्ये त्यांनी उमरखेड शहरांमध्ये बी आर एस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती . पण हा पक्ष महाराष्ट्रात नामशेष झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि संजय जाधव यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी नुकताच शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आगामी नगरपालिका निवडणूक मध्ये हे आपला करिष्मा दाखवतील अशी आशा मतदारांना आहे .सध्या तरी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीचे चित्र कसे स्पष्ट होते यावर अनेक पक्षाचे भवितव्य अवलंबून असले तरी दामोदर इंगोले यांच्या प्रवेशामुळे उमरखेड मध्ये या पक्षाला मजबूती आली असल्याची चर्चा लोकांकडून ऐकायला मिळत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0